S M L

छातीत दुखू लागल्याने भुजबळ रुग्णालयात दाखल

Samruddha Bhambure | Updated On: Apr 18, 2016 09:46 PM IST

छातीत दुखू लागल्याने भुजबळ रुग्णालयात दाखल

मुंबई – 18 एप्रिल :  माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना छातीत दुखू लागल्याने आज मुंबईत सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मनी लाँड्रींग प्रकरणी भुजबळ हे ऑर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.

मुंबईतील ईडीच्या कार्यालयात अधिकार्‍यांकडून आज सकाळी छगन भुजबळांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर भुजबळांना अचानक छातीत दुखू लागलं. तपासणी केल्यानंतर भुजबळांना लागेचच सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आलं. उच्च रक्तदाबही असल्याने त्यांना थेट आयसीयूत भरती केलं गेलं. सेंट जॉर्ज रुग्णालय ईडीच्या कार्यालयाजवळच आहे.

भुजबळांची प्रकृती काहीशी अस्थिर आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना जेजे हॉस्पीटलमध्ये हलवण्यात येणार आहे. मनी लाँड्रींग प्रकरणी छगन भुजबळांसह त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना कोर्टाने 27 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोघांनाही ऑर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 18, 2016 09:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close