S M L

व्हॅटवाढीच्या निषेधार्थ बंद

23 मार्चव्हॅटवाढीच्या निषेधार्थ राज्यातील घाऊक व्यापार्‍यांनी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे. त्याला औरंगाबाद शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील जुना आणि जाधववाडी मोंढा येथे किराणा आणि धान्यांची पन्नास टक्के दुकाने बंद होती. औरंगाबाद शहरातील व्यापार्‍यांनी व्हॅट आणि जकातीलासुध्दा विरोध केला आहे. जकात रद्द करण्याच्या मागणीसाठी व्यापार्‍यांनी अनेक वेळा व्यापार बंद ठेवलेत. औरंगाबाद महापालिका ' ड ' वर्गात येते. त्यामुळे व्हॅटवाढीला व्यापार्‍यांचा काही प्रमाणात विरोध आहे.नागपुरात बंदव्हॅटच्या विरोधात आज नागपूरच्या महत्वाच्या बाजारपेठा बंद राहिल्या. नागपूरच्या इतवारी गांधीबाग भागातील बाजारात नागपूर व्यापारी संघठनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी दुकाने बंद ठेवून सरकारचा निषेध करण्यात आला. व्हॅट वाढवल्याने सर्वसामान्य लोकांना अधिक महागाईला समोरे जावे लागेल, असे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. व्यापारी प्रतिनिधींची बैठकयेत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी राज्यातील सर्व व्यापारी प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सरकारने आपला निर्णय कायम ठेवला तर, 27 तारखेच्या बैठकीत राज्यव्यापी बेमुदत बंदबाबत निर्णय होणार आहे. ही माहिती फेडरेशन ऑफ असोशिएशन ऑफ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष राजेश शहा यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 23, 2010 10:07 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2010 10:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close