S M L

रॅडिको डिस्टिलरीत पंकजा मुंडेंच्या पतीची भागिदारी, नवाब मलिक यांचा आरोप

Samruddha Bhambure | Updated On: Apr 19, 2016 12:22 PM IST

रॅडिको डिस्टिलरीत पंकजा मुंडेंच्या पतीची भागिदारी, नवाब मलिक यांचा आरोप

औरंगाबाद – 19 एप्रिल :  दुष्काळग्रस्त भागात सेल्फीमुळे वादात सापडलेल्या राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सगळीक़डून चौफेर टीका होत असताना, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या नव्या आरोपांची भर पडली आहे. औरंगाबाद एमआयडीसीत पंकजा यांचे पती चारूदत्त पालवे यांची डिस्टलरी असल्यानेच त्यांनी दारू कारखाण्याचं पाणी तोडायला विरोध केला होता, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी एक सविस्तर फेसबुकही टाकली आहे.

पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे हे रॅडिको डिस्टिलरीचे संचालक आहेत. शेंद्रा एमआयडीसीत रॅडिको डिस्टिलरी आहे. या कारखान्याला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धक्कादायक बाब म्हणजे पंकजा मुंडे याही संचालक होत्या. आता त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे, असे नवाब मलिक यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर म्हटलं आहे.

त्यामुळे 'दारु कारखान्यांचं पाणी तोडू नका' या पंकजा मुंडेंच्या वक्तव्याला वैयक्तिक स्वार्थाची किनार असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. लोकांना प्यायला पाणी नसतांना स्वतःच्या बियर कारखान्याकरिता पाणी वापरून दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ लावणार्‍यांनो , जनता माफ नाही करेगी , असेही मलिक यांनी म्हटले आहे. या डिस्टलरीत जैन , किसान फर्म आणि पालवे यांची भागीदारी आहे. त्यापैकी 30 टक्के शेअर्स हे पंकजा पालवे यांचे पती चारुदत्त पालवे यांच्या मालकीचे असल्याची माहिती समोर आली आहे. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2016 11:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close