S M L

पोलिसांत तक्रार केली म्हणून तलवार घेऊन 'तो' रस्त्यावर उतरला आणि ट्रक पेटवला !

Sachin Salve | Updated On: Apr 19, 2016 06:11 PM IST

पोलिसांत तक्रार केली म्हणून तलवार घेऊन 'तो' रस्त्यावर उतरला आणि ट्रक पेटवला !

ठाणे - 19 एप्रिल : दारू पिऊन धिंगाणा घालणार्‍या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्री उशिरा सोडून दिले खरे परंतु त्यानंतर त्याने रागाच्या भरात हातात तलवार घेऊन तक्रारदारांचा शोध घेत घेतला आणि कोणीच न मिळाल्याने नारळाने भरलेला एक अख्खा ट्रक पेटवून दिला. हा धक्कादायक प्रकार ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात घडला. त्या माथेफिरूला पोलिसांनी परत अटक करून गुन्हा नोंदवला आहे. वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ मात्र टळला. घडल्या प्रकाराने परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसर तसा पूर्वीपासून औद्योगिक परिसर म्हणून सर्वश्रुत आहे. सोमवारी रात्री 25 वर्षीय उमर मकबूल अहमद शेख याने दारूच्या नशेत रस्त्यावर धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. येणर्‍या जाणार्‍यांना शिवीगाळ करत महिलांची देखील त्याने छेड काढल्याचे रहिवाश्यांचे म्हणणं आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर त्याला वागळे पोलिसांनी ताब्यात घेऊन उशिरा सोडून दिलं. परंतु, घडल्या प्रकाराने संतापलेल्या उमर याने हातात तलवार घेऊन पुन्हा तक्रारकर्त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

परंतु, उशीर झाल्याने त्याला तिथे कोणीच सापडले नाही म्हणून रागाच्या भरात त्याने उभा असलेला नारळाने भरलेला ट्रक पेटवून दिला. बघता बघता अख्खा ट्रक पेटू लागल्याने पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आलं. त्यानंतर पोलिसांनी माथेफिरू उमर याला जेरबंद करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवला. पोलिसांनी आधीच त्याला सोडले नसते तर हा प्रकार घडलाच नसता असे मत स्थानिकांनी व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2016 06:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close