S M L

सिंचन घोटाळा : कंत्राटदारांनी केला बेकायदा वाळूचा उपसा

Sachin Salve | Updated On: Apr 19, 2016 07:56 PM IST

सिंचन घोटाळा : कंत्राटदारांनी केला बेकायदा वाळूचा उपसा

19 एप्रिल : सिंचन घोटाळ्यातील दोषी कंत्राटदारांनी धरणांच्या बांधकामासाठी नदीपात्रातीलच वाळू वापरल्याचं स्पष्ट झालंय. महत्वाचं म्हणजे कोट्यवधी रुपयांची वाळू बिना रॉयल्टी वापरल्या बद्दल कॅगच्या अहवालात ठपका ठेवण्यात आलाय.

महालेखा परिक्षणाच्या अहवालात एफए कंस्ट्रक्शन कंपनीने धरणाच्या कामात वाळूचा घोटाळा केल्याचा ठपका ठेवलाय. एफए कंस्ट्रक्शनने बाळगंगा प्रकल्पाच्या बांधकामासाठी 3.44 लाख ब्रास वाळू वापरली. एवढ्या वाळूसाठी 6.88 कोटी रॉयल्टी सरकारजमा करण्याऐवजी सरकारी अधिकार्‍यांनी या कंपनीला केवळ 3.44 कोटी रुपये रॉयल्टी भरण्यास सांगितलं.

त्यातही या कंपनीने फक्त एक कोटी रुपये सरकारजमा केले होते. अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने हा घोटाळा झाल्याच ठपका या अहवालात ठेवण्यात आला. हा अहवाल सरकारने स्विकारला आहे. यावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. याच कंपनीचे मालक असलेले खत्री परिवारातील पाच जण मोखाबर्डी सिंचन प्रकल्प घोटाळ्यातील आरोपी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2016 07:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close