S M L

मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा, कर्जमाफीमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्येचं प्रमाण घटलं !

Sachin Salve | Updated On: Apr 19, 2016 08:36 PM IST

मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा, कर्जमाफीमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्येचं प्रमाण घटलं !

19 एप्रिल : 'शेतकर्‍यांना कर्जमाफी देणं थांबवलं तर आत्महत्या थांबतील हे खरं नाही' असा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. पण, मुख्यमंत्र्यांचा हा दावा आता खोटा ठरलाय. 2008 साली युपीए सरकारने शेतकर्‍यांची कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्येची संख्या कमी झाल्याच स्पष्ट होतंय.

अस्मानी आणि सुल्तानी संकटात सापडलेल्या बळीराजाने आत्महत्याचा मार्ग पत्कारला. आजपर्यंत अनेक शेतकर्‍यांनी कर्जबाजारीपणा कंटाळून आत्महत्या केल्याच्या स्पष्ट झालंय. त्यामुळे शेतकर्‍यांना कर्जमाफी करा अशी मागणी वारंवार झाली. आघाडी सरकारने हा निर्णय घेतलाही. पण, फडणवीस सरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यास नकार दिला. शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली तर शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतील हे खरं नाही. 2008 साली आघाडी सरकारने कर्जमाफी केली. त्यानंतर 2010 साली 668 आत्महत्या विदर्भात झाल्यात आणि 2015 ला 608 आत्महत्या विदर्भामध्ये झाल्या आहेत. जर कर्जमाफी हा रामबाण उपाय असता तर सरकारने जाहीर केल्या योजनाचा आढावा घेण्याची गरज आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात दिली होती.

पण, सरकारी आकडेवारीनुसार 2008 साली यूपीए सरकारने शेतकर्‍याची कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्येची संख्या कमी झाल्याचं स्पष्ट होतंय. 2001 पासून ते 2006 पर्यंत शेतकरी आत्महत्येचा हा आकडा 62 वरून 2000 घरात जाऊन पोहचला. त्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कृषी मंत्री शरद पवारांसह महाराष्ट्राचा दुष्काळी दौरा केला. आणि महाराष्ट्रात शेतकर्‍याच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे शेतकर्‍यांपेक्षा बँकांचा फायदा झाल्याचे आरोप झाले. पण, काही प्रमाणात का होईना शेतकर्‍यांना दिलासा मिळाला हेच सत्य आहे. हे आम्ही नाही तर राज्य सरकारच्या आकडेवारीतून समोर आलंय. 2007 मध्ये 2076 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. कर्जमाफीनंतर 2008 साली हाच आकडा 1966 वर आला. त्यानंतर 2009 साली 1605 वर आला. 2010 मध्ये 1741 आणि 2011 मध्ये हाच आकडा 1518 वर आला होता. 2013मध्ये हा आकडा 1296 वर आला होता. त्यानंतर फडणवीस सरकारच्या काळात हा आकडा 3228 वर पोहचला. हे सर्व सरकारी आकडेवारीवरुन समोर आलंय.

शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी

वर्ष आत्महत्यांची संख्या

 2001 - 62

 2002 - 122

 2003 - 180

 2004 - 640

 2005 - 609

 2006 - 2376

 2007 - 2076

(2007-08मध्ये कर्जमाफी जाहीर)

2008 - 1966

2009 - 1605

2010 - 1741

2011 - 1518

2012 - 1473

2013 - 1296

2014 - 1981

2015 - 3228

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2016 08:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close