S M L

ठाण्यातील तरुणाला ग्रीसमध्ये अटक

Sachin Salve | Updated On: Apr 19, 2016 11:02 PM IST

ठाण्यातील तरुणाला ग्रीसमध्ये अटक

19 एप्रिल : ग्रीसमध्ये जहाजातल्या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडलाय या प्रकरणी ठाण्यातील तरुणाला ग्रीसमध्ये अटक करण्यात आलीये. कल्पेश शिंदे असं त्या तरुणाचं नाव आहे. कल्पेश जात असलेल्या मार्गावर आयसिसची शस्त्रास्त्र वाहतूक होते आणि याच जहाजातून इजिप्तहून कल्पेश ग्रीसला जात होता अशी माहिती मिळतेय. कल्पेशच्या जहाजात 50 हजार शस्त्रास्त्र सापडल्याचा आरोप आहे.

शिपिंग कंपनीमध्ये चांगला भविष्य घडतात असा विचार करून ठाणे इथल्या कल्पेश शिंदे यांनी शिपिंगचा कोर्स केला आणि शीपवर काम करायला ही गेला पण 7 महिने उलटले तो परतला नाही. तीन महिन्यांपूर्वी त्याला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार

कल्पेशची शीप ज्या मार्गाने जात होती. त्या मार्गाने नेहमी आयसिस त्यांच्यासाठी शस्त्र घेऊन जातात आणि सुरक्षेच्या दृष्टीने तो मार्ग खूपच संवेदनशील आहे. कल्पेशला नोकरी लागल्यानंतर तो मुंबईहून तुर्कीला गेला जिथून सायप्रसला गेला. हुदाद शीपवर तो कामाला लागला होता तीन महिन्यांपूर्वी ग्रीसहून निघाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2016 11:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close