S M L

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करणार्‍या महिलांना मारहाण

Samruddha Bhambure | Updated On: Apr 20, 2016 02:02 PM IST

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करणार्‍या महिलांना मारहाण

नाशिक – 19 एप्रिल : नाशिक इथल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करू पाहणार्‍या स्वराज्य महिला संघटनेच्या महिलांना आज (बुधवारी) पुन्हा एकदा स्थानिक महिला आणि गावकर्‍यांनी मारहाण केली.

मंदिरातील गर्भगृहात महिलांच्या प्रवेशाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. ती वेळ उलटल्यानंतर गर्भगृहात प्रवेश करू पाहणार्‍या महिलांना गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरच अडवण्यात आलं. यावेळी स्थानिक महिला आणि आंदोलकांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप स्वराज्य महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असल्यामुळे देशभरातून भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. मंदिर प्रवेशाबाबत लिंगभेद न करण्याच्या कोर्टाच्या आदेशानंतरही या मंदिराच्या गर्भगृहात महिलांना प्रवेशासाठी सकाळी सहा ते सात वाजण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. पण या वेळेनंतर श्रीपूजकांशिवाय कोणालाही मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश दिला जात नाही. यापूर्वीही स्वराज्य संघटनेच्या महिलांना गर्भगृहात प्रवेश मिळवण्यासाठी आंदोलन केलं होतं. त्यावेळीही महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2016 02:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close