S M L

तृप्ती देसाईंचा एल्गार, 28 तारखेला हाजी अली दर्ग्यात जाणार

Sachin Salve | Updated On: Apr 20, 2016 05:53 PM IST

तृप्ती देसाईंचा एल्गार, 28 तारखेला हाजी अली दर्ग्यात जाणार

मुंबई - 20 एप्रिल : शनि शिंगणापूरच्या आंदोलनानंतर आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मुस्लिम बांधवांच्या प्रसिद्ध श्रद्धास्थळ असलेल्या हाजी अली दर्ग्याकडे मोर्चा वळवलाय. हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश देण्यात यावा अशी मागणीच तृप्ती देसाई यांनी केली आहे. यासाठी येत्या 28 तारखेला दर्ग्यात प्रवेश करणार अशी घोषणाही तृप्ती देसाईंनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केली.

शनि शिंगणापूरच्या शनी मंदिराच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्यासाठी तृप्ती देसाई यांनी मोठा लढा दिला. अखेरीस त्यांच्या या लढ्याला सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या याचिकेमुळे यश मिळालं. विद्या बाळ यांच्या याचिकेमुळे कोर्टाने मंदिराचे द्वार मोकळे करून दिले. त्यानंतर मागील महिन्यात तृप्ती देसाई यांनी शनी मंदिराच्या चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेतलं.

मध्यंतरी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या गांभार्‍यात प्रवेशादरम्यान झालेल्या मारहाणीत तृप्ती देसाई जखमी झाल्या होत्या. उपचारानंतर तृप्ती देसाई यांनी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केलीये. यावेळी तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यासाठी आंदोलन करणार आहे. हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश देण्यात यावा अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.

या मागणीसाठी हाजी सबके लिये फोरमची स्थापना करण्यात आली असून 28 तारखेला हाजी अली दर्ग्यात प्रवेश करणार अशी घोषणा तृप्ती देसाई यांनी केलीये. या आंदोलनाआधी हाजी अली दर्ग्याच्या ट्रस्टींशी चर्चा करणार असंही देसाई यांनी सांगितलं. मात्र, या पत्रकार परिषदेत देसाई यांच्या भूमिकेमुळे मुस्लिम बांधवांनी गोंधळ घातला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2016 05:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close