S M L

शहाडमध्ये हत्येनंतर तरुणीवर बलात्कार केल्याचं उघड, चारही नराधम अटकेत

Sachin Salve | Updated On: Apr 20, 2016 08:13 PM IST

शहाडमध्ये हत्येनंतर तरुणीवर बलात्कार केल्याचं उघड, चारही नराधम अटकेत

ठाणे - 20 एप्रिल : चोरीसाठी खून करणार्‍या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलंय. या टोळीचा म्होरक्या अल्पवयीन आहे. याप्रकरणी एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक बाबसमोर येतेय. या टोळीनं 13 एप्रिलच्या रात्री कल्याणजवळच्या शहाडमध्ये एका तरुणीची हत्या केली होती. हत्येनंतर या टोळीने तरुणीवर बलात्कार केला होता अशी कबुली दिलीये. या प्रकरणी अल्पवयीन आरोपींवर सज्ञान गुन्हेगाराप्रमाणे खटला चालवू द्या, असा अर्ज आज पोलीस कोर्टात दाखल केलाय.

13 एप्रिल रोजी शहाड येथील साईराम सोसायटीतील आपल्या घरात झोपलेल्या एका 22 वर्षी तरुणीचा देखील अज्ञात हल्लेखारांनी तलवारीने वार करून हत्या केली होती. या तरुणीवर अल्पवयीन आरोपीने बलात्कार देखील केला होता. एका आठवड्यात लागोपाठ तरुणीसह एका सुरक्षा रक्षकाची हत्या आणि दोघा सुरक्षा रक्षकांवर झालेले गंभीर स्वरूपाचे प्राणघातक हल्ल्याच्या घटनांनी कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेमुळे पोलीस देखील चक्रावले होते.

सुरक्षा रक्षकांवर हल्ला करून त्यांना मारण्याचा प्रयत्न करणारी टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय होता. गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटे 6 वाजेच्या सुमारास सापळा लावून एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलासह नितीन सखाराम वाघे (19), नितेश उर्फ नित्या भगवान भोईर (20), रवींद्र उर्फ रवी बबन वाघे (20) या चार तरुणांना अटक केली.

पोलिसांनी या चारही नराधमांची चौकशी केली असता शहाड येथील तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याची कबुली दिली. ही तरुणी इंजीनिअरिंगची विद्यार्थिनी होती, आणि ती यूपीएससीचीही तयारी करत होती. शासकीय नोकरी मिळवण्याचे तिचे प्रयत्न होते. पण या टोळीच्या गुन्ह्यामुळे तिचा नाहक जीव गेला. या प्रकरणी आता सज्ञात गुन्हेगाराप्रमाणे खटला दाखल करावा अशी मागणी पोलिसांनी कोर्टात केली आहे. जर कोर्टाने परवानगी दिली तर देशातली ही पहिली घटना ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2016 06:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close