S M L

मुंबईत 500 कोटींचा टँकर घोटाळा, सोमय्यांचं सेनेवर आरोपास्त्र

Sachin Salve | Updated On: Apr 20, 2016 09:28 PM IST

मुंबईत 500 कोटींचा टँकर घोटाळा, सोमय्यांचं सेनेवर आरोपास्त्र

20 एप्रिल : भाजप आणि शिवसेनेतील धुसफूस आता आणखी चव्हाट्यावर आली आहे. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर आणखी गंभीर आरोप केलाय. मुंबईत 500 कोटींचा टँकर घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या आरोपामुळे भाजप सेनतला वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे.

देवानार कचरा डेपोला लागलेल्या आगीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण पेटलं होतं. किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला टार्गेट करत कचरा डेपोला लागलेल्या आगीला शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वाकयुद्ध पेटले होते. आता पुन्हा सोमय्यांनी शिवसेनेवर थेट आरोप केलाय. मुंबईत 500 कोटींचा टँकर घोटाळा झालाय. या घोटाळ्याला शिवसेना जबाबदार आहे असा आरोपच सोमय्यांनी केला.

मुंबईत दररोज 1 कोटी लिटर पाणी पुरवठा होतो. त्यातलं 90 लाख लिटर पाण्याचा घोटाळा होत आहे. पाणी माफीया हे पाणी चढ्या भावानं विकतात असं किरीट सोमय्यांचं म्हणणं आहे. सोमय्यांच्या या आरोपाला शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी प्रत्युत्तर दिलंय. किरीट सोमय्या शिवसेनेला विनाकारण टार्गेट करत आहेत. त्यांनी हे विसरू नये की महापालिकेत दोघांचीही सत्ता आहे. त्यामुळं सोमय्यांनी जबाबदारीनं आरोप करावे. जर काही गैरव्यवहार झाला असले तर आयुक्त कडक कारवाई करतील अशा शब्दात शेवाळेंनी किरीट सोमय्यांना सुनावलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2016 08:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close