S M L

पाणी टंचाईचा आणखी 1 बळी, विहिरीतून पाणी काढताना चिमुरड्याचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Apr 21, 2016 03:06 PM IST

पाणी टंचाईचा आणखी 1 बळी, विहिरीतून पाणी काढताना चिमुरड्याचा मृत्यू

बीड - 21  एप्रिल  : दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात पाणी टंचाईचा आणखी बळी केला असून विहरीतून पाणी काढताना एका 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाल्याची दुदैर्वी घटना समोर आली आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा इथे आज (गुरुवारी) सकाळी 11 वर्षांचा सचिन गोपीनाथ केंगार घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीतील पाणी काढण्यासाठी गेला होता. पाणी काढताना विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यु झाला.

बीडमध्ये एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. या आधी काल मंगळवारी साबळेवाडीच्या योगिता अशोक देसाई (वय 11) ही शाळकरी मुलगीचा दुष्काळाने बळी घेतला. योगिता दिवसभर आईसोबत हातपंपावरून पाणी आणण्यासाठी गेली होती. दरम्यान तीव्र उन्हात हंडा भरण्यासाठी थांबल्याने पाण्याचा उपसा करताना तिला उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 21, 2016 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close