S M L

कन्हैयाच्या मुंबईतील कार्यक्रमाचं स्थळ बदललं

Samruddha Bhambure | Updated On: Apr 22, 2016 12:06 PM IST

479115-kanhaiya-kumar

मुंबई - 21 एप्रिल :  जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारची मुंबईतली सभा वादात अडकण्याची शक्यता आहे. मुंबईच्या वरळी भागात याआधी कन्हैया कुमारच्या सभेचे आयोजन केलं होतं. मात्र वरळी पोलिसांच्या जाचक अटीमुळे आता कार्यक्रम स्थळ बदलण्यात आलं आहे. आता उद्या टिळकनगरमधील आदर्श शाळेच्या सभागृहात कन्हैयाचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.

वरळी येथील जनता शिक्षण संस्थेत कन्हैयाची सभा होणार होती. त्यावर संघटनांच्या आयोजकांना पोलिसांनी 24 अटी घातल्या. मात्र, एका दिवसात सर्व अटी पूर्ण करणं शक्य नसल्याने स्थळ बदलण्यात आलं. यासंबंधी डाव्या संघटना आणि पोलिसांमध्ये वाटाघाटी चालू आहेत. मात्र, काहीही झालं तरी हा कार्यक्रम होणारच असं डाव्या संघटनांकडून म्हटलं जातेय. यापूर्वी, कन्हैयाच्या नागपूर इथल्या सभेत चप्पलफेक, दगडफेक असे प्रकार घडले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2016 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close