S M L

एवढा चिडणारा मुख्यमंत्री मी कधीच पाहिला नाही -सुप्रिया सुळे

Sachin Salve | Updated On: Apr 22, 2016 08:14 PM IST

एवढा चिडणारा मुख्यमंत्री मी कधीच पाहिला नाही -सुप्रिया सुळे

उस्मानाबाद - 22 एप्रिल : राज्याचा मुख्यमंत्री हा त्या पदाला सांभाळून भाषण करणारा असावा. पण, देवेंद्र फडणवीस हे त्याला अपवाद आहे. मुख्यमंत्री इतकी भाषणं करतात आणि इतके चिडतात की त्यांच्या एवढा चिडणारा मुख्यमंत्री मी कधीच पाहिला नाही अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीये.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मराठवाड्याच्या दौर्‍याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज त्यांनी उस्मानाबादमध्ये दुष्काळी भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. या सरकारला दुष्काळाचं गांभीर्य नाही. विरोधकांवर बोलणार्‍या सरकारला काम करता येत नसेल तर राजीनामा देऊन आमच्या हातात सत्ता द्यावी आम्ही काम करू असं आव्हानच सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.

तसंच राज्याचा मुख्यमंत्रिपदी असणार्‍या व्यक्तीने भाषण करतांना समतोल राखला पाहिजे. आतापर्यंत सर्वच मुख्यमंत्र्यांनी हा नियम पाळला. पण, देवेंद्र फडणवीस हे त्याला अपवाद आहे. ते भाषणात सारखे चिडता. त्यांच्या एवढा चिडणारा मुख्यमंत्री मी कधीच पाहीला नाही. त्यातच त्याचं नैराश्य दिसतं अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. तसंच एक तर पाऊस पडला नाही. त्यामुळे धरणं भरलीच नाही. जर धरणं भरली नाहीच तर सिंचन घोटाळा होण्याचा प्रश्नच नाही असं प्रत्युत्तरही सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2016 08:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close