S M L

स्पेनची 200 किमी वेगाने धावणारी मिनी बुलेट ट्रेन मुंबईत दाखल

Sachin Salve | Updated On: Apr 22, 2016 10:49 PM IST

स्पेनची 200 किमी वेगाने धावणारी मिनी बुलेट ट्रेन मुंबईत दाखल

मुंबई - 22 एप्रिल : बुलेट ट्रेनच्या वेगाशी स्पर्धा करेल, जिला अगदी मिनी बुलेट ट्रेन म्हणता अशा टॅल्गो कंपनीची ट्रेन मुंबईत दाखल

झाली आहे. स्पेन वरुन आलेल्या या ट्रेनचे एकूण 9 डब्बे आहेत. आणि 200 किमी प्रति तास वेगाने धावेल अशी ही वेगवान आणि हलकी ट्रेन आहे.

विशेष म्हणजे सध्या पसरलेल्या रेल्वे जाळ्यावरच ही धावू शकणार असल्यानं तिला वेगळे काही ट्रॅक किंवा सुविधा निर्माण करण्याची गरज नाही. टॅल्गो या कंपनीनं स्वत : पुढाकार घेऊन भारतीय रेल्वे ट्रॅकवर तिची चाचणी करण्यासाठी आणली आहे. आणि जर तिची चाचणी यशस्वी ठरली तर मात्र मुंबई दिल्ली या मार्गावर ती लवकरच धावणार आहे.

अशी आहे मिनी बुलेट !

- 200 किमी प्रतितास धावु शकेल

- वजनाने हलकी आणि वेगवान

- विजेची 30 टक्के बचत

- मुरादाबाद ते बरेली मार्गावर होणार चाचणी

- ही चाचणी 115 किमी प्रति तास वेगाने

- चाचणी यश्स्वी झाल्यास मुंबई दिल्ली मार्गावर धावेल

- सध्या बिपीटीमध्ये आहेत

- कस्टम क्लिअरन्स मिळाल्यानंतर इज्जतनगर डेपोला रवाना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2016 10:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close