S M L

...आणि पंकजा मुंडेंनी हाती घेतली पोलिसांची काठी

Sachin Salve | Updated On: Apr 23, 2016 01:31 PM IST

 ...आणि पंकजा मुंडेंनी हाती घेतली पोलिसांची काठी

23 एप्रिल: जलसंधारण प्रकल्पाची पाहणी करताना सेल्फी काढल्यानंतर वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा आणखी एक नवीन प्रकार समोर आलाय. सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागाच्या दौर्‍यावर आलेल्या पंकजा मुंडे यांनी गर्दी आपलेच कार्यकर्ते आणि समर्थकांना दूर ठेवण्यासाठी थेट पोलिसांची काठीच हातात घेतल्याचे दिसून आलं.

पंकजा मुंडे साताऱ्याच्या दाैऱ्यावर आहेत. पंकजा मुंडे एका कार्यक्रमस्थळी जेव्हा पोहोचल्या त्यावेळी कार्यकर्ते आणि महिलांची प्रचंड गर्दी झाली. या गर्दीतून मार्ग काढत पंकजा मुंडे व्यासपीठावर पोहोचल्यात. पण गर्दीला आवर घालण्यासाठी स्वत : पंकजा मुंडेंनाच पोलिसांची भूमिका बजाववी लागली. स्वत: पोलिसांची काठी घेऊन त्या गर्दीतून मार्ग काढत होत्या.  यावेळी अनेक पोलीस संरक्षणासाठी तैनात असताना पंकजा मुंडे यांनी पोलिसांची काठी हातात घेवून समर्थक आणि कार्यकर्ते यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.

पंकज मुंडेंनी सातार्‍यात बोलताना सेल्फीवरून झालेल्या टीकेवरही उत्तर दिलं.  एक फोटो काढला म्हणून माझ्या बापाच्या वयाचे लोक माझ्यावर आरोप करतायत असा संताप त्यांनी व्यक्त केलाय. तर पंकजांच्या सेल्फीवर टीका करणार्‍यांवर सदाभाऊ खोत यांनी ही टीका केली. एसी बंद करून किमान सेल्फी काढण्यासाठी तरी उन्हात या तेव्हा कळेल उन्हाच्या झळा काय असतात असे सांगत टीकाकारांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला सदाभाऊ खोत यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 23, 2016 01:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close