S M L

...तर तृप्ती देसाईंना चपलेनं मारू, शिवसेना नेत्याचा इशारा

Sachin Salve | Updated On: Apr 23, 2016 02:58 PM IST

...तर तृप्ती देसाईंना चपलेनं मारू, शिवसेना नेत्याचा इशारा

23 एप्रिल : तृप्ती देसाई जर हाजी अली दर्ग्यात घुसण्याचा प्रयत्न केला तर चपलेनं मारू असा इशारा शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांनी दिलाय. त्यांच्या या विधानामुळे खळबळ उडाली असून त्यांच्या वक्तव्यावर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

शनी शिंगणापूर, अंबाबाई मंदिराच्या यशस्वी लढ्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाईंनी मुंबईतील मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थळ असलेल्या हाजी अली दर्ग्याकडे मोर्चा वळलाय. ये त्या 28 तारखेला हाजी अली दर्ग्यात प्रवेश करणार अशी घोषणा तृप्ती देसाईंनी केलीये.

अपक्षेप्रमाणे इथं त्यांना कडाडून विरोध झालाय. तृप्ती देसाई यांनी जर हाजी अली दर्ग्यात शिरल्या तर त्यांना चपलेनं मारू, अशी धमकीच शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांनी एका पत्रकाद्वारे दिलीये. आपलं हे व्यक्तीगत मत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 23, 2016 01:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close