S M L

पाण्याअभावी 'स्वामी समर्था'चं मोफत अन्नछत्र बंद पडण्याची शक्यता

Sachin Salve | Updated On: Apr 23, 2016 06:29 PM IST

पाण्याअभावी 'स्वामी समर्था'चं मोफत अन्नछत्र बंद पडण्याची शक्यता

अक्कलकोट - 23 एप्रिल : 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' असं सांगणार्‍या अक्कलकोटच्या स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळावर पाण्याअभावी महाप्रसाद बंद करण्याची भिती सतावतेय. दुष्काळामुळे शहरातील विहिरी प्रशासनाने अधिग्रहीत केल्यात. यामध्ये मंडळाला पाणी पुरवठा करणार्‍या विहीरीचा समावेश आहे. त्याचा फटका मंडळाला बसतोय, पाण्याअभावी यात्री भवन बंद करण्यात आलंय. येत्या काही दिवसांत पाणी पुरवठा न झाल्यास 27 वर्षांपासून सुरू असलेले मोफत अन्नछत्र बंद करण्याची वेळ मंडळावर येऊ शकते.

पाणी टंचाईमुळे सध्या अक्कलकोट शहरात वीस दिवसांतून केवळ एकदा पाणीपुरवठा केला जातोय. अन्नछत्र मंडळ आणि मंदिर समितीने शहरापासून आठ किलोमीटर अंतरावरच्या गळोरगी गावात कोट्यवधी रूपये खर्चून मोठी विहीर बांधली होती. या विहिरीतून अन्नछत्र मंडळ आणि यात्री निवासासाठी पाणी उपसा केला जात होता. मात्र सरकारने ही विहीर अधिग्रहीत केली आणि अन्नछत्र मंडळाचा पाणीपुरवठा पुर्णपणे बंद केला. एप्रिल महिन्यात 1 लाख लिटर तर मे महिन्यात 50 हजार लिटर पाणी देण्याचे आदेश प्रांताधिकार्‍यांनी दिले होते. मात्र, आदेश डावलण्यात आल्याचा आरोप अन्नछत्र मंडळाच्या विश्वस्तांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 23, 2016 06:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close