S M L

नागपूरच्या बालसुधार गृहातून 21 मुलं पळाली, 10 मुलांना पकडण्यात यश

Sachin Salve | Updated On: Apr 25, 2016 09:33 AM IST

नागपूरच्या बालसुधार गृहातून 21 मुलं पळाली, 10 मुलांना पकडण्यात यश

नागपूर -25 एप्रिल : पाटणकर चौक येथील बालसुधार गृहातून 21 मुलं पळून गेल्याची घटना घडली. रविवारी रात्री ही मुलं पळाली. मात्र, त्यांच्यापैकी 10 मुलं सापडली आहेत. 11 मुलं फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

पाटणकर चौकातील या सुधारगृहात सध्या 50 मुलं आहेत. या बालसुधार गृहात कनिष्ठ काळजी वाहकचे चार पदरिक्त आहेत. सध्या दोन काळजी वाहक आहेत आणि ते 12-12 तास आळीपाळीनं ड्युटीवर असतात. रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर मुलांनी पळ काढला. या दरम्यान कनिष्ठ काळजी वाहक सुनिल भिलकर हा रोजंदारी कर्मचारी ड्युटीवर होता. त्याच्या डोळ्यात मिर्चीची पुड टाकून ह्या मुलांनी तेथून पळ काढला. 2013 मध्ये याच सुधारगृहातून 17 मुलं पळाली होती. या सुधारगृहात एकावेळी एकच कर्मचारी असल्यामुळे नेहमीच अशा घटना घडत असल्याचे सुधारगृहातील कर्मचार्‍यांकडून सांगण्यात येतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2016 09:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close