S M L

आयसिसमध्ये 30 भारतीयांना सामील करणार मोहम्मद शफी अरमार ठार

Sachin Salve | Updated On: Apr 25, 2016 02:51 PM IST

आयसिसमध्ये 30 भारतीयांना सामील करणार मोहम्मद शफी अरमार ठार

25 एप्रिल : आयसिस या दहशतवादी संघटनेत भारतीय तरुणांची भरती करणारा मोहम्मद शफी अरमार याला ठार करण्यात आलं आहे. सीरियात अमेरिकेने काही दिवसांपूर्वी केलेल्या हल्ल्यात शफीचा खात्मा झाल्याचं कळतं.

26 वर्षीय मोहम्मद शफी हा मूळचा कर्नाटकमधील भटकळ गावचा रहिवासी आहे. भारतातील तरुणांनी आयसिसमध्ये भरती करण्याचं महत्त्वाचं काम शफीकडे होतं. त्याने सुमारे 30 तरुणांना आयसिसमध्ये भरती केल्याचं समजतंय. मोहम्मद शफी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरुणांच्या संपर्कात होता. फेसबुक ग्रुप आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करुन त्याने 600 ते 700 तरुणांशी संपर्क साधला होता. इतकंच नाही तर तरुणांची भरती करण्यासाठी त्याने ऑनलाईन ट्रान्सफर आणि हवालामार्फत फंड जमा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2016 02:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close