S M L

शिवसैनिकांकडूनच शाखाप्रमुखाच्या ऑफिसची तोडफोड

24 मार्चमुंबईतील वरळी भागातील शिवसेनेचे शाखा प्रमुख दत्ता नरवणकर यांच्या ऑफिसची शिवसैनिकांनीच तोडफोड केली आहे. या हल्ल्यात शिवसेनेच्या ऍम्बुलन्सचीही तोडफोड झाली आहे.याबाबतची तक्रार वरळी पोलिसांत दाखल झाली आहे. हल्ल्यात नरवणकर यांचे बंधू गजानन नरवणकर आणि उपशाखाप्रमुख प्रशांत गवस यांना मारहाण झाली आहे. दरम्यान मंगळवारी रात्री शिवसेना समर्थक नगरसेवक परशुराम देसाई यांच्यावरही हल्ला झाला. देसाई हे वरळीतील वार्ड क्रमांक 192 चे नगरसेवक आहेत. काल संध्याकाळी शिवसेनेच्या शाखाप्रमुखांची नावे जाहीर करण्यात आली. त्यातूनच हा वाद पुढे आल्याची चर्चा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2010 10:24 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2010 10:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close