S M L

मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणी 8 आरोपींची निर्दोष मुक्तता

Samruddha Bhambure | Updated On: Apr 25, 2016 06:34 PM IST

मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणी 8 आरोपींची निर्दोष मुक्तता

नाशिक - 25 एप्रिल : मालेगावात 2006 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील 8 आरोपींची आज (सोमवारी) मुंबईतील विशेष कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. बॉम्बस्फोट प्रकरणात 13 जणांना अटक करण्यात आली होती. त्यातील 9 आरोपींची सुटका केली, मात्र त्यापैकी 1 आरोपीचा मृत्यू झाला असून बाकीचे फरार आहेत. हे सर्व 'सिमी'शी संबंधित असल्याचं सांगण्यात आलं होतं.

मालेगावमध्ये 8 सप्टेंबर 2006 ला बडी रातच्या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटात 37 जणांचा मृत्यू होता. तर तब्बल 125 जण जखमी झाले होते. सुरुवातीला हे प्रकरण एटीएसकडे होते. एटीएसच्या तपासानुसार यात सिमी संघटनेचा हात असल्याचं समोर आलं होतं. सीमी या संघटनेवर भारतात बंदी आहे. याप्रकरणाचा तपास यानंतर सीबीआयकडे सोपवण्यात आला. ज्या आरोपींना एटीएसनं आरोपी ठरवलं होतं, त्याच आरोपींकडे सीबीआयचंही लक्ष होतं. एनआयकडे तपास गेल्यानंतर या प्रकरणाचा तपास नव्यानं सुरू केला. ज्यानुसार मुस्लीम संघटनांव्यतिरिक्त भगवा दहशतवादही असल्याचं समोर आलं.

दरम्यान, याप्रकरणात आपला हात नसल्याचं म्हणत या आरोपांतून मुक्त केलं जावं अशी मागणी कोर्टात केली. यानंतर कोर्टाने एनआयएला या अर्जावर त्यांचं म्हणणं सांगायला सांगितलं. ज्यावर या आरोपींचा काहीही हात नसल्याचं एनआयएनं सांगितलं. म्हणून या आरोपींना मुक्त करण्याला आमचा आक्षेप नसल्याचं म्हटलंय. त्यावर कोर्टाने आज हा निकाल दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2016 06:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close