S M L

दाऊदला जीवघेणं गँगरिन, दोन्ही पाय कापले जाणार!

Samruddha Bhambure | Updated On: Apr 26, 2016 10:38 AM IST

Dawood Ibrahim123

25 एप्रिल :  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला गँगरिन झालं आहे. त्यामुळे दाऊदचा पाय कापावं लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दाऊदचा गँगरिन शेवटच्या स्टेजला पोहोचल्यामुळे आम्हाला त्याचा पाय कापावा लागेल, अशी माहिती दाऊदवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी दिली आहे. दाऊदवर सध्या कराचीतल्या राहत्या घरी उपचार सुरू आहे. लिकायत नॅशनल हॉस्पिटल आणि कंबाइन्ड मिलिटरी हॉस्पिटलचे डॉक्टर्स त्याच्यावर उपचार करत आहेत.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, हाय बीपी आणि डायबेटिसमुळे दाऊदचा गँगरिन बळावलं असून, तो संपूर्ण शरीरात पसरत आहे. त्यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दाऊदचं पाय कापण्याची शक्यता आहे.

1993 साली मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटाचा दाऊद मास्टरमाईंड आहे. तेव्हापासूनच दाऊद भारताबाहेर पळून गेलाय.

दरम्यान, दाऊद जायबंदी झाल्यामुळे ISIने त्याला संरक्षण दिल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. त्याला कराचीमध्येच ठेवण्याचा निर्णय उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आलाय.

गँगरिन म्हणजे काय ?

- त्वचा किंवा सॉफ्ट टिशूमधल्या पेशींचा मृत्यू

- पेशींना रक्तपुरवठा न झाल्यामुळे पेशींचा मृत्यू

- हातापायांच्या बोटांना गँगरिन होण्याची शक्यता जास्त

- सिगारेट, दारू, जाडेपणामुळे गँगरिन होण्याची शक्यता वाढते

- गँगरिन झालेल्या भागाजवळ इन्फेक्शन होतं आणि ते रक्ताद्वारे शरीरात पसरतं

- अनियंत्रित मधुमेहामुळे पेशींना होणारा रक्तपुरवठा हळुहळू कमी होत जातो

- मधुमेही व्यक्तीला गँगरिन झाल्यास तो भाग कापावा लागतो

- गँगरिन झालेला भाग कापला नाही, तर ते जीवघेणं ठरू शकतं

- वेळीच उपचार न झाल्यास गँगरिनमुळे मृत्यू होऊ शकतो

- हा आजार संसर्गजन्य नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2016 10:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close