S M L

मद्य उत्पादन कंपन्यांना दणका, 60 टक्के पाणीकपातीचे कोर्टाचे आदेश

Sachin Salve | Updated On: Apr 26, 2016 01:30 PM IST

मद्य उत्पादन कंपन्यांना दणका, 60 टक्के पाणीकपातीचे कोर्टाचे आदेश

औरंगाबाद - 26 एप्रिल : मराठवाड्यातील मद्य उत्पादन कंपन्यांना औरंगाबाद खंडपीठाने दणका दिला. मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातील मद्य उत्पादन कारखान्यांना 60 टक्के पाणी कपातीचे आदेश दिले आहे. तर इतर उद्योगांसाठी 25 टक्के पाणी कपातीचे आदेश देण्यात आले आहे.

दुष्काळाने होरपळणार्‍या मराठवाड्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालीये. पण, दुसरीकडे मद्य उत्पादन कंपन्यांचा बेसुमार पाण्याचा उपसा सुरू आहे. या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातील 12 जिल्ह्यातील मद्य उत्पादन कंपन्यांना कोर्टाने कडक आदेश दिले आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी प्राध्यान्याने मिळावे असं नमूद करत कोर्टाने 60 टक्के पाणीकपातीचे आदेश दिले आहे. तसंच इतर उद्योगांसाठी 25 टक्के कपातीची आदेश दिले आहे. येत्या 10 मे ते 27 जूनपर्यंत ही पाणीकपात लागू असणार आहे. भविष्यकाळात पाणीटंचाईची समस्य तीव्र झाली तर संपूर्ण 100 टक्के पाणीकपात करण्यात येईल असंही कोर्टाने नमूद केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2016 01:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close