S M L

इंडियन मुजाहिद्दीनचा हस्तक झैनुल अबेदिन याला अटक

Samruddha Bhambure | Updated On: Apr 26, 2016 06:38 PM IST

 Terror attack131

मुंबई – 26 एप्रिल :  इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हस्तक आणि मुंबईत 2011 साली झालेल्या 13/7 साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी झैनुल अबेदिन याला मंगळवारी सकाळी महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. झैनुलविरोधात याआधीच रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.

मुंबईत झवेरी बाजारात झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी एटीसकडून त्याचा शोध सुरू होता. याशिवाय, कर्नाटक आणि गुजरात राज्याचे पोलीसही झैनुलच्या मागावर होते. अखेर मंगळवारी त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं.

पोलिसांच्या माहितीनुसार, झैनुलवर मुंबईवरील 13/7 या साखळी बॉम्बस्फोटासाठी स्फोटके पुरविल्याचा आरोप आहे. दरम्यान, झैनुलला अटक केल्यानंतर त्वरित न्यायालयासमोर उभे करण्यात आले. न्यायालयाने झैनुलला 6 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2016 06:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close