S M L

सिंधुदुर्गात सेना-भाजपचं 'निवडणुकीत खेळ चाले', विरोधी पक्षाचे उमेदवार काळी जादू करून जिंकले

Sachin Salve | Updated On: Apr 27, 2016 02:42 PM IST

सिंधुदुर्गात सेना-भाजपचं 'निवडणुकीत खेळ चाले', विरोधी पक्षाचे उमेदवार काळी जादू करून जिंकले

27 एप्रिल : राज्यात जादूटोणा विरोधी कायदा लागू होऊन काही वर्षे उलटून गेलीयत. मात्र, अजूनही जादूटोणा लोकांच्या मनात अजूनही घर करून बसलेलं आपल्याला पाहायला मिळतेय. आणि यापासून सत्तेत असलेले शिवसेना-भाजप पक्षाचे पदाधिकारी देखील दूर नाहीत. अंधश्रद्धेत ही लोकं किती बुडून गेलीये. याच उदाहरण सिंधुदुर्गात पाहायला मिळतंय. कुडाळ नगरपंचायतीत पराभूत झालेल्या शिवसेना भाजपच्या उमेदवारांनी आपला पराभव चक्क विरोधकानी केलेली काळी जादू आणि करणीमुळे झाला असल्याच म्हटलंय. भाजपाचे पराभूत उमेदवार आणि जिल्हा चिटणीस संतोष शिरसाट तसंच शिवसेनेच्या पराभूत उमेदवार आणि कुडाळच्या माजी सरपंच असलेल्या स्नेहल पडते यांनी पराभूत उमेदवारांच्या वतीने संयुक्त पत्रक काढलंय.

या पत्रात असा अजब दावा करण्यात आलाय की, कुडाळ शहर नगरपंचायत निवडणुकीमध्ये कुडाळ शहरवासीय दादागिरी आणि दहशततीला भिक घालत नाहीत म्हणून मतदरांना वश करण्यासाठी काहीजणांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी अघोरी विद्येचा प्रयोग करून अघोरी यश मिळविले.

आतापर्यंत मतदारांना आश्वासनं,प्रलोभनं देण्यात येत होती. पण यावेळी अघोरी दैवी प्रकार करायला सुरुवात झाली. प्रभाग क्र.4 मध्ये तर प्रत्येक वाटेवर,प्रत्येक घरासमोर,घराच्या मागील दारात लिंबू टाकण्यात आले होते. प्रत्येक लिंबावर 4WD असं लिहून त्यावर हळद,पिंजर टाचण्या टोचून ठेवले होते. वार्ड क्र. 4 मधील शिवसेना उमेदवार स्नेहल पडते यांच्या घराजवळ शुक्रवारी रात्री 12.30 वाजेच्यानंतर कोहळा,चार लिंबू,एक बाहुलं,रक्ताची बाटली टाकली . या राजकरण्यांनी कुडाळातील सर्वच वॉर्डमध्ये हे प्रयोग केले.

अशी कृत्ये करण्यापर्यंत या राजकणी लोकांची मजल गेली. हे सर्व कर्म करून दुसर्‍यांच्या नावाचा बोभाटा आणि अपप्रचार करून या निवडणुकीत अशाप्रकारचे अघोरी यश मिळविलं. या राजकरण्यांनी कुडाळातील सर्वच वॉर्डमध्ये हा प्रयोग केला. कर्नाटकमधून आलेला एक अघोरी बाबा या निवणुकीमध्ये आणून प्रत्येक वार्डात त्याला फिरवले.

त्याने एका पक्षाच्या सर्व उमेदवारांना काळा धागा बांधला. हे उमेदवार काळा धागा बांधून लोकांसमोर,मतदारांसमोर मत मागायला जात होते आणि मतदरांना वश करत होते. त्या कर्नाटकी बाबाला पिंगुळीतील नामांकित हॉटेलमध्ये आणून ठेवले. हे सर्व कुणी केले याचा पर्दाफाश आता मतदार जनतेला होत आहे. तरी सुज्ञ कुडाळ शहरावासीय वेळीच जागे व्हावे असं आवाहनही या पत्रकात करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 27, 2016 02:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close