S M L

भाजप-सेनेत आता शिवरायांवरुन राजकारण

Sachin Salve | Updated On: Apr 27, 2016 04:46 PM IST

shelar and uddhavमुंबई - 27 एप्रिल : छत्रपती शिवाजी महाराजांवरून पक्षांमध्ये राजकारण रंगणं हे काही नवीन नाही. आता एक मे अर्थात महाराष्ट्र दिन जवळ आलाय आणि सेना भाजपमध्ये त्यावरून राजकारण रंगतंय. शिवाजी महाराज हे एका पक्षाची प्रॉपर्टी नाही. 30 तारखेला रात्री 9 वाजता भाजपचा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रम होणारच असं आव्हान भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिलंय.

मुंबई विमानतळाबाहेर हायवेच्या शेजारी महाराजांचा सुंदर आणि भव्य पुतळा आहे. इथं शिवसेना कार्यक्रम करणार की भाजप, यावरून वाद सुरू आहे. त्यातच आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सेनेला आव्हान दिलंय. 30 एप्रिलच्या रात्री 9 ते 10 या वेळेत तिथे भाजपचाच कार्यक्रम होणार आहे. आणि 1 आणि 2 मे रोजी तिथे भाजपची सजावटही राहील, असं शेलार यांनी सांगितलंय. शिवसेनेनंही तिथे खुशाल कार्यक्रम करावा, आमचं काही म्हणणं नाही, पण आमचा कार्यक्रम बदलणार नाही, असं शेलारांनी स्पष्ट केलं. तसंच गोरेगांवच्या पुलाला नाव देण्याचं राजकारण भाजपच्या कार्यकर्त्यांनी करू नये असं आवाहनही शेलारांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 27, 2016 04:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close