S M L

नारायण राणेंनी घेतली संदीप सावंत यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट

Sachin Salve | Updated On: Apr 27, 2016 05:35 PM IST

नारायण राणेंनी घेतली संदीप सावंत यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट

 27 एप्रिल : संदीप सावंत मारहाण प्रकरणी आज काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी ठाण्यातील शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन संदीप सावंत यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. हा आमचा कार्यकर्ता असून काही तरी गैरसमजातून हा प्रकार घडलाय अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली.

मेळाव्याला आला नाही म्हणून काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना अपहरण करून बेदम मारहाण केल्याचा आरोप झालाय. या प्रकरणी निलेश राणेंच्या विरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. निलेश राणे यांनी 10 लाख रुपये दिले नाही म्हणून संदीप सावंतने हा बनाव केल्याचा आरोप केलाय. आज खुद्द नारायण राणे यांनी ठाण्यातील शासकीय रुग्णालयात जाऊन संदीप सावंतांची भेट घेतली. संदीप सावंत यांना मारहाण का झाली याचा तपास पोलीस करत आहे. सत्य काय आहे ते लवकरच तपासातून पुढे येईलच. पण, हा आमचा कार्यकर्ता असूनगैरसमजातून हे सगळं घडलंय असं राणे म्हणाले. तसंच संदीप सावंतांच्या उपचाराचा खर्च आपणच उचलणार असल्याचं राणेंनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 27, 2016 05:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close