S M L

बांधकामं अधिकृत करण्याचं धोरण अनधिकृतच, कोर्टाची सरकारला चपराक

Sachin Salve | Updated On: Apr 27, 2016 08:13 PM IST

मुंबई - 27 एप्रिल : राज्य सरकारने जाहीर केलेल्या अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याच्या धोरणाला आज मुंबई हायकोर्टाने केराची टोपली दाखवली. याचबरोबर कोर्टाने अत्यंत कडक शब्दांत सरकारचा समाचार घेतला. हे धोरण बनवण्याची आधी याचा पर्यावरणावर काय परिणाम होईल, याचा साधा विचार तरी सरकारनं केला होता का ?, असा सवाल कोर्टाने उपस्थित केला.

mumbai high court434अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यामुळे पिंपरी चिंचवड, ठाणे,नवी मुंबईतील दिघावासियांना दिलासा मिळाला होता. तर दुसरीकडे, अनधिकृत बांधकाम करणार्‍या बिल्डरांवर कारवाई न करत निर्णय जाहीर केलाच कसा असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता. राज्य सरकारच्या या धोरणात्मक निर्णयावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली यावेळी हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलीच चपराक लगावली. पर्यावरणावर काय परिणाम होईल याचा विचार न करता निर्णय घेतलाच कसा ?, असा निर्णय घेण्याआधी शहरांच्या नागरी सुविधेवर किती परिणाम होईल याचा अभ्यास केला का ?, असा सवाल उपस्थित करत अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याचा धोरणाला हायकोर्टाने केराची टोपली दाखवलीये. तसंच सादर केलेल्या आकडेवारीवरूनही कोर्टाने सरकारला झापलं. एकट्या पिंपरीत जर 66 हजार अनधिकृत बांधकामं आहेत, तर राज्यात एकूण अनधिकृत बांधकामं अडीच लाखाहून कमी आहेत, असा दावा तुम्ही कसा करू शकता, अशी विचारणाही कोर्टाने केली.

कोर्टाने काय म्हटलं?

- धोरणाचा पर्यावरणावर काय परिणाम होईल, याचा काडीमात्र विचार सरकारनं केला नाही

-शहरांच्या नागरी सुविधांवर याचा काय परिणाम होईल, याचा विचार सरकारनं केला का?

- सध्याच्या कायद्यांमध्ये सरकारनं आवश्यक बदल केले नाहीत

- हे धोरण एमआरटीपी कायदा आणि विकास नियंत्रण अधिनियमाशी विसंगत आहे

- धोरण आखण्याआधी सरकारनं परिणामांचं मूल्यमापन केलं का?

- एकट्या पिंपरीत 66,000 अनधिकृत बांधकामं आहेत. मग राज्यातल्या अनधिकृत बांधकामांचा आकडा अडीच लाखांपेक्षा कमी, असा दावा सरकार कसा करू शकतं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 27, 2016 08:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close