S M L

मुंबईत हरीश चेंबर इमारतीला आग

Sachin Salve | Updated On: Apr 28, 2016 01:12 PM IST

मुंबईत हरीश चेंबर इमारतीला आग

मुंबई - 28 एप्रिल : दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील लायन्स गेटजवळ हरीश चेंबर इमारतीला भीषण आग लागलीये. या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरही आग लागलीये. आग विझवण्यासाठी 5 फायर इंजिन आणि 4 पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्याचं काम सुरू आहे. आगीच्या दुर्घटनेमुळे परिसरात वाहतूक कोंडी झालीये. उपाययोजना म्हणून लायन्स गेट जवळील वाहतूक काही वेळासाठी थांबवण्यात आलीये. ही आग कशी लागली हे अद्याप कळू शकलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2016 01:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close