S M L

पंकज भुजबळांसह संजय काकडेंविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट

Sachin Salve | Updated On: Apr 28, 2016 01:50 PM IST

पंकज भुजबळांसह संजय काकडेंविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट

28 एप्रिल : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात झालेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राष्ट्रवादीचे नेते पंकज भुजबळांसह तब्बल 44 जणांविरूद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलंय. त्यामध्ये पंकज भुजबळ यांच्यासोबतच राज्यसभा खासदार संजय काकडे, चिमणकर बंधू, आसिफ बलवा, विनोद गोयंका, श्याम प्रवीणकुमार जैन, सुरेश जागडोया, संजीव जैन, श्याम मालपाणी यांच्यासह अनेक बड्या नावांचा समावेश आहे.भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनीच ही माहिती दिलीय. ईडीच्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय.

दरम्यान, ईडीने अजामीनपात्र जारी करताच पंकज भुजबळ नॉट रिचेबल झाल्याची चर्चा आहे. आमच्या प्रतिनिधीनं त्यांना फोन केला असता पंकज भुजबळांचा फोन आऊट ऑफ कव्हरेज एरिया असं सांगत आहे. पंकज हे मुंबईतल्या त्यांच्या सांताक्रूझच्या घरी आहेत, असं समजतंय. पण, याची पुष्टी होऊ शकलेली नाही. दरम्यान. आपल्यांशी चर्चा करून आज ते या अटक वॉरंटला कोर्टात आव्हान देतील, असं सूत्रांकडून समजतंय.

काय आहे हा घोटाळा?

- दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणापासून सुरुवात निविदा न काढता भुजबळ समर्थक बिल्डर चमणकरांना काम कामासाठी पैसे न देता अंधेरीमधल्या भूखंडात अतिरिक्त एफएसआय द्यावा

- अंधेरीतील आरटीओ कार्यालयाची इमारत, मलबार हिलमधील गेस्ट हाऊस बांधावं. या तिन्ही कामांचा खर्च : 300 कोटी. पण दिलेल्या जागेची एकूण किंमत : 10 हजार कोटींपेक्षा जास्त

- सदनासाठी देवीशा इन्फ्रा आणि एडन कंपन्यांकडे काम

- या कंपन्यांमध्ये समीर आणि पत्नी, पंकज आणि त्यांची पत्नी आणि चमणकर यांची भागीदारी

- जवळपास 62 कंपन्यांमध्ये समीर, पंकज यांची भागीदारी

- काही पैसा हवालामार्गे पाठवून इंडोनेशियातील कोळसा खाणींमध्ये गुंतवणूक

यांच्याविरुद्ध बजावलं अजामीनपात्र वॉरंट

पंकज भुजबळ

कृष्णा चमणकर

प्रशांत चमणकर

प्रसन्ना चमणकर

खा. संजय काकडे

विनोद गोयंका

सुनील दामोदर नाईक

सुरेश जागडोया

प्रवीणकुमार जैन

संजीव जैन

चंद्रशेखर सारडा

संजय दिवाकर जोशी

तन्वीर शेख

दीपक शिंदे

निलेश साहू

सत्यन केसरकर

सुधीर साळसकर

अमित श्रीवास्तव

राजेश धारप

निमिष बेंद्रे

शैलेष मेहता

धनपत शेठ

राजेश मेस्त्री

विपुल काकरिया

नारायण पगराणी

आसिफ बलवा

पद्मनाभन शेखर

जगदीश पुरोहीत

कपिल पुरोहीत

श्याम मालपाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2016 01:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close