S M L

पाणी प्रश्नावर चर्चेसाठी कधीही तयार, राजेंद्र सिंहांचं पवारांना आव्हान

Sachin Salve | Updated On: Apr 29, 2016 08:36 PM IST

पाणी प्रश्नावर चर्चेसाठी कधीही तयार, राजेंद्र सिंहांचं पवारांना आव्हान

29 एप्रिल : आम्ही उसाच्या विरोधी नाही. पण आताची जी परिस्थिती आहे ती उसामुळे निर्माण झाली आहे. मी इथं आल्यावर अनेक लोकांनी टीका केली असेल पण त्यांना माहिती नाही मीही एका शेतकर्‍याचा मुलगा आहे. जर कुणाला पाणीप्रश्नावर माझ्यासोबत चर्चा करायची असेल तर कुठेही आणि कधीही बोलवा मी येण्यास तयार आहे असं आव्हान जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव घेता दिलंय.

राज्यातली पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीनं IBN लोकमतनंही हातभार लावायचा ठरवलंय. त्यासाठी आयबीएन लोकमत प्रस्तुत जागर पाण्याचा पाणी परिषद मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलीये. या परिषदेच्या पहिल्या सत्रात पाण्याचं समन्यायी वाटप आणि नियोजन यावर दिग्गजांनी आपलं परखड मत मांडत भविष्यातील पाणी नियोजनाचा लेखाजोखा मांडलाय. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, हिवरेबाजार गावचे सरपंच पोपटराव पवार, सेमाजसेवक विकास आमटे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भारत पाटणकर पहिल्या सत्रात उपस्थित होते. IBN लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे आणि महेश म्हात्रे यांनी या सत्राचं संचलन केलं.

यावेळी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी पाणीप्रश्नावर प्रकाश टाकला. एकेकाळी महाराष्ट्र विकासात सर्वात पुढे होता. पण, आज महाराष्ट्र पाणीटंचाईत सर्वात पुढे आहे. याला कारण म्हणजे ऊस लागवड आणि पाण्याचं चुकीचं नियोजन. ऊस हे सर्वात जास्त पाणी खेचून घेणारं पीक आहे. पण, मराठवाड्याच्या मातीत पाणी जिरत नाही. कारण तीथं खाली खडक आहे. म्हणून येणारं पाणी जमिनीत खोलपर्यंत जाऊ शकत नाही. त्यासाठी महाराष्ट्रात पिकाचं नियोजन हे पाण्याच्या आणि पावसाच्या नियोजनानुसार करायला हवं आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकं घ्यायला हवीत असं मत राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केलं.

'दुष्काळी भागात साखर कारखाने नको'

तसंच महाराष्ट्राला पाणीदार बनवून ठेवायचं असेल तर महाराष्ट्राला पाण्याच्या कायद्याची गरज आहे. खरं पाहता दुष्काळी भागात साखर कारखान्यांसारखे कारखाने उभे करू नयेत असा सल्लाही राजेंद्र सिंह यांनी दिला. तसंच जलयुक्त शिवार योजना कंत्राटमुक्त ठेवली हे चांगलं केलं. कारण, कंत्राटदार आले की गैरव्यवहारही आला. जलयुक्त शिवार योजना ही चांगली योजना असून तिला हातभार लावला पाहिजे असंही सिंह म्हणाले.

IBN Lokmatjagar_panyacha_33राजेंद्र सिंहांचं शरद पवारांना चर्चेचं आव्हान

तसंच मी इथं आलो आणि काही बोललो म्हणून माझ्यावर टीका झाली. पण, उसामुळे जे संकट आलंय. ते श्रीमंत आणि गरीबांमधली दरी वाढवणार आहे. मी काही विश्लेषक नाहीये. पण मी नद्यांना पुर्नजीवित केलंय. शरद पवारांना माहिती नाही की मी सुद्धा एका शेतकर्‍याचा मुलगा आहे. येणार्‍या संकटाची चाहूल ज्याला लागते आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी पुढे येतो ती चांगली व्यक्ती असते. ज्यांची माझ्यावर टीका केली त्यांचा मी सन्मान करतो. पाणीप्रश्नावर कुठेही आणि कधीही चर्चा करण्यास बोलवा मी येण्यास तयार असं आव्हान राजेंद्र सिंहांनी शरद पवारांना दिलं.

'तुमच्याकडे वॉटर रिझर्व्ह बँक आहे का ?'

त्याचबरोबर जल सुरक्षा अभियान विधेयक अजून आलं नाही. पाण्यासाठी आणि जमिनीतून पाणी काढण्यासाठी लायसन्स सिस्टम असण्यापेक्षा त्यासाठी समान अधिकार असला पाहिजे. तुमच्याकडे पोलीस, सैन्य आहे पण तुमच्याकडे वॉटर रिझर्व्ह बँक आहे का ? असा सवालही सिंह यांनी उपस्थिती केला. तर गावात नीर नारी पंचायत समिती बनवली पाहिजे. महिलाच विहिरीतल्या पाण्याच नियोजन करू शकतात. त्यांना हे अधिकार दिले पाहिजेत असं मतही सिंह यांनी व्यक्त केलं. याच परिषदेत विकास आमटे, भारत पाटणकर आणि हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी आपली भूमिका मांडली.

राजेंद्र सिंह यांच्या भाषणातील मुद्दे

एकेकाळी महाराष्ट्र विकासात सर्वात पुढे होता -राजेंद्र सिंह

आज महाराष्ट्र पाणीटंचाईत सर्वात पुढे -राजेंद्र सिंह

ऊस हे सर्वात जास्त पाणी खेचून घेणारं पीक-राजेंद्र सिंह

मराठवाड्याच्या मातीत पाणी जिरत नाही-राजेंद्र सिंह

पाणी आणि पावसानुसार पीक नियोजन व्हावं-राजेंद्र सिंह

पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकं घ्यावीत-राजेंद्र सिंह

दुष्काळी भागांमध्ये साखर कारखाने नकोत-राजेंद्र सिंह

महाराष्ट्राला पाण्याच्या कायद्याची गरज -राजेंद्र सिंह

जल संरक्षणासाठी कायदा तयार व्हावा-राजेंद्र सिंह

भारत पाटणकर यांच्या भाषणातील मुद्दे

पाण्याचं समन्यायी वाटप केलं तरच भविष्यात पाणी -भारत पाटणकर

दुष्काळी भागांतले साखर कारखाने बंद व्हावेत -भारत पाटणकर

पावसाचं पाणी अडवणं, नियोजन करणं महत्त्वाचं -भारत पाटणकर

पाण्याचा अपव्यय झाल्यानं पाणीटंचाई -भारत पाटणकर

पाण्याचं समन्यायी वाटप केलं तरच सर्वांना भविष्यात पाणी मिळेल -भारत पाटणकर

दुष्काळी भागातले साखर कारखाने बंद करण्याचा निर्णय घ्यायला हवेत -भारत पाटणकर

पाणी होतं तोपर्यंत पाण्याचा अपव्यय झाला आणि टंचाई निर्माण झाली तेव्हा आरक्षणाच्या मागे लागलो -भारत पाटणकर

विकास आमटे यांच्या भाषणातील मुद्दे

आनंदवनात दुष्काळ पडला नाही -विकास आमटे

कारण आनंदवनात कुष्ठरोग्यांनी मेहनत केली -विकास आमटे

आनंदवनात पाण्याची कमतरता जाणवत नाही -विकास आमटे

आनंदवन आज सुजलाम् सुफलाम् -विकास आमटे

पोपटराव पवार यांच्या भाषणातील मुद्दे

जलसंधारणाच्या कामात गुणवत्ता यायला हवी -पोपटराव पवार

तरच आपण दुष्काळाचा सामना करू शकू -पोपटराव पवार

पाण्याचा उपयोग कसा करावा याचंही प्रशिक्षण व्हावं -पोपटराव पवार

भूजल व्यवस्थापनाची नितांत गरज -पोपटराव पवार

पाणी आणि पावसानुसार पीक नियोजन व्हावं -पोपटराव पवार

शेतीचं क्षेत्र कायम ठेवून उत्पादकता वाढवली पाहिजे -पोपटराव पवार

भूजल व्यवस्थापन आणि पाण्याचा काटेकोर वापर -पोपटराव पवार

लोकसहभाग आणि लोकजागृती हे हिवरेबाजारचं यश -पोपटराव पवार

दुधाच्या व्यवसायाकडे गंभीर लक्ष देण्याची गरज -पोपटराव पवार

अन्यथा प.महाराष्ट्रातही आत्महत्या सुरू होतील --पोपटराव पवार

आज बाजार समित्यांमध्ये शेतकरी देव झाला पाहिजे होता पण तिथे व्यापारी झाला - पोपटराव पवार

आपण जमिनी खालची आद्रता संपवून टाकलीये. त्यामुळे येणार्‍या काळात वड,पिंपळासारखी झाडं नष्ट होतील - पोपटराव पवार

वेळेत दूधाच्या दराचं नियोजन झालं नाही तर लोकांना रडण्याची वेळ यईल - पोपटराव पवार

दूधाच्या प्रश्नावर वेळीच तोडगा काढला नाहीतर गावच्या गाव रस्त्यावर येतील -पोपटराव पवार

दुधाच्या व्यवसायाकडे गंभीर लक्षं दिलं नाही तर पश्चिम महाराष्ट्रातही आत्महत्या सुरू होतील - पोपटराव पवार

पाणी, दूध आणि शेतकरी हा अजेंडा सरकारला घ्यावा लागेल -पोपटराव पवार

सरकारने पाणी अधिवेशन घेतले पाहिजे - पोपटराव पवार

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2016 02:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close