S M L

जमावबंदी उल्लंघन प्रकरणी तृप्ती देसाईंविरोधात दुसरा गुन्हा दाखल

Sachin Salve | Updated On: Apr 30, 2016 01:39 PM IST

trupti_in_haji_aliमुंबई - 30 एप्रिल : गावदेवी पोलीस ठाण्यात भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांच्याविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावदेवी पोलीस ठाण्यातही देसाईंसह सहा महिला कार्यकर्त्यांविरुद्ध 132 मुंबई पोलीस कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हाजी अली दर्ग्यात प्रवेश नाकारल्यानंतर तृप्ती देसाईंनी आपला मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याकडे वळवला होता. मात्र पोलिसांनी त्यांना गावदेवी परिसरातच अडवून ठेवले. त्यामुळे देसाईनी तिथेच निदर्शनं करण्यास सुरुवात केल्यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. हाजी अली दर्ग्याबाहेर परवानगी नसताना आंदोलन करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात देसाई यांचायह 15 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यापाठोपाठ गावदेवी पोलीस ठाण्यातही देसाईंसह सहा महिला कार्यकर्त्यांविरुद्ध 132 मुंबई पोलीस कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गावदेवी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत सोडून दिले. त्यानंतर देसाई तत्काळ पुण्याला निघून गेल्या.परवानगी नसताना आंदोलन केल्या प्रकरणी गावदेवी ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 30, 2016 01:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close