S M L

मुंबईत आता बाईकवर मागे बसणार्‍यांनाही हेल्मेट सक्ती !

Sachin Salve | Updated On: Apr 30, 2016 01:52 PM IST

मुंबईत आता बाईकवर मागे बसणार्‍यांनाही हेल्मेट सक्ती !

30 एप्रिल : मुंबईत नुसतं बाईक चालवतांना हेल्मेट वापरणे बंधनकारक नसून मागे बसणार्‍यांनाही हेल्मेट वापरावे लागणार आहे. याबद्दल मुंबई पोलिसांनी मोहिम हाती घेतलीये.

राज्यभरात हेल्मेट सक्तीनंतर आता मुंबई पोलिसांनी मोटरसायकल चालावणार्‍याच्या मागे बसणार्‍याला ही हॅल्मेट वापरणे सक्तीचे होणार आहे. यासाठी वाहतूक पोलिसांनी नुकतीच विशेष मोहिम हाती घेतली आहे. मुंबईचा विचार करता दररोज लाखो वाहनांची वर्दळ असते. पण अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडी ही मुख्य समस्या आहेत. त्यातच मोटरसायकल स्वार सुसाट वेगाने वाहन हाकत असतात. परिणामी त्यांना अपघात होण्याची शक्यता असते. याची दखल घेऊन वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने गेल्या वर्षी मोहिम हाती घेतली होती. कारवाईच्या भितीमुळे मोटरसायकल चालक हे हॅल्मेटचा वापर करू लागले आहेत. त्या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद पाहून आता मोटरसायकल स्वाराच्या मागे बसणार्‍यांना देखील आता हेल्मेट सक्तीचे असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 30, 2016 01:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close