S M L

दुष्काळमुक्त महाराष्ट्र उभा करू,मुख्यमंत्र्यांनी केला संकल्प

Sachin Salve | Updated On: May 1, 2016 09:49 AM IST

दुष्काळमुक्त महाराष्ट्र उभा करू,मुख्यमंत्र्यांनी केला संकल्प

01 मे 2015 मुंबई : आज 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन...मुंबईमधल्या हुतात्मा चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत दुष्काळावर मात करून दुष्काळमुक्त महाराष्ट्र उभा करू असा संकल्प केलाय.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं राज्यात सर्वत्र निरनिराळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 1 मे 1960 या दिवशी मुंबई प्रांताची

विभागणी होऊन महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी अभिमानानं 1 मे हा महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत दुष्काळावर मात करण्याची ग्वाही दिलीये. संयुक्त महाराष्ट्रासाठी 106 हुतात्म्यांनी प्राण पणाला लावून मिळवलेलं हे राज्य आहे. महाराष्ट्र राज्य बलशाली करण्याचा आमचा संकल्प असून तो आम्ही पूर्ण करणार आहोत असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. यंदा राज्यासमोर दुष्काळी परिस्थितीच्या मुकाबल्याचे आव्हान आहे. या परिस्थितीत पाणीटंचाईची भर पडली आहे. मात्र, सरकार अतिशय प्राधान्याने आणि संवेदनशीलतेने ही परिस्थिती हाताळत आहे. या परिस्थितीवर तात्कालिक आणि कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी सरकार विविध आघाड्यांवर प्रयत्नशील आहे. विशेषत: जलसंधारणासाठी उपयुक्त ठरू शकणार्‍या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्यात येत आहेत अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 1, 2016 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close