S M L

नागपुरात फडकला स्वतंत्र विदर्भचा झेंडा, यवतमाळमध्ये बसेस फोडल्या

Sachin Salve | Updated On: May 1, 2016 03:10 PM IST

नागपुरात फडकला स्वतंत्र विदर्भचा झेंडा, यवतमाळमध्ये बसेस फोडल्या

01 मे : सर्वत्र महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असताना यवतमाळमध्ये आज विदर्भवाद्यांनी एसटी बसेसची तोडफोड केली. स्वतंत्र विदर्भाची मागणी करत काही कार्यकर्त्यांनी सात बसेस फोडल्या. यावेळी दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर नागपूरमध्ये वेगळ्या विदर्भाचा स्वतंत्र झेंडाही फडकवण्यात आला.

राज्यभरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत आहे. पण, विदर्भवादी नेत्यांनी आजच्या दिवशी काळा दिवस पाळण्याचं ठरवलंय. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनासाठी राज्याचे माजी महाधिवक्ता आणि विदर्भावादी नेते श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात आज नागपूरमध्ये स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकवण्यात आला. यावेळी सर्व विदर्भवादी संघटनांचे नेते उपस्थित होते. आज विदर्भातील 23 शहरात स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकवला जातोय. तर दुसरीकडे विदर्भवादी कार्यकर्त्यांना आक्रमक होत रस्त्यावर उतरले आहे. यवतमाळमध्ये विदर्भवाद्यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी करत सात बसेस फोडल्या. कार्यकर्त्यांनी एसटी बसेसवर दगडफेक करत तोडफोड केली. या प्रकरणी दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. काही दिवसांपूर्वीच वेगळ्या विदर्भाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास हिंसा घडतील असा इशारा अणेंनी दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 1, 2016 12:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close