S M L

शिरुर : बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुरड्याची 26 तासांपासून झुंज सुरू

Sachin Salve | Updated On: May 1, 2016 05:12 PM IST

शिरुर : बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुरड्याची 26 तासांपासून झुंज सुरू

shrurboy4पुणे -01 मे: शिरुरमध्ये एका बोअरवेलमध्ये पडलेल्या चार वर्षांच्या चिमुरड्याची 26 तासांपासून झुंज सुरू आहे. या मुलाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. एनडीआरएफच्या मदतीने मुलाला बाहेर काढण्याचं काम सुरू आहे

पुण्यातील शिरूर तालुक्यातील माडवगण फराटा येथे सुनील मोरे हा चार वर्षाचा चिमुकला शेतात खेळत असताना अचानक बोअरवेलमध्ये पडला. सुनील हा आपली आजी तुळसाबाई मोरे हिच्या सोबत नवनाथ शितोळे यांच्या शेतामध्ये गेला होता. शितोळे यांच्या शेतात काल रात्री बोअरवेलची खोदाई करण्यात आली होती. हा बोअरवेलचा खड्डा सुनीलच्या खेळत असताना लक्षात न आल्याने सुनील हा बोअरवेल मध्ये पडला. सुनील बोरवेलमध्ये पडल्याच लक्षात येताच गावाकर्‍यांनी जवळच्य वरदविनायक हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या मदतीने या बोअरवेलमध्ये पडलेल्या सुनीललातातडीने ऑक्सिजन पुरवण्यात आलं. सोबतच स्थानिक ग्रामस्थांनी दोन जेसीबी च्या साहाय्याने या ठिकाणी खोददकाम सुरू केलं. जे सी बी मशीनने बोअरवेलच्या चारही बाजूला खड्डा खोदून सुनीलला

बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. सुनीलला बोअरवेल मधुन बाहेर काढण्यासाठी पुण्यातून एनडीआरएफची टीम देखील घटना स्थळी दाखल झाली आहे. बोअरच्या त्या पाईपमध्ये दगड पडल्यामुळे मदत कार्यात अडथळा निर्माण झालाय.तरीही सर्व यंत्रणा कार्यात झोकुन देऊन बचावकार्य चालू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 1, 2016 05:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close