S M L

आज राज्याचा अर्थसंकल्प

25 मार्च महाराष्ट्र राज्याचा आर्थिक वर्ष 2010-11 साठीचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात सादर होत आहे. अर्थमंत्री सुनील तटकरे आज त्यांचा पहिला अर्थसंकल्प मांडतील. राज्य सरकारने अधिवेशनाला सुरुवात होण्याआधीच व्हॅट वाढवलेला आहे. आजच्या अर्थसंकल्पात कशावर भर असू शकतो त्यावर एक नजर टाकूयात-झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार आधीच राज्य सरकारने व्यक्त केलाय. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वांसाठी घरं बांधण्याच्या योजनांना प्राधान्य दिले जाईल.गेल्या वर्षभरात सिंचन क्षेत्र फक्त 2.1 टक्क्यांनी वाढले आहे. ही टक्केवारी वाढवण्यावर भर दिला जाईल.यासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे कृषी कर्जात सवलत आणि नागरी सुविधा वाढवण्यावर भर दिला जाईल.यासोबत सरकारचे उत्पन्न वाढावे यासाठी चैनीच्या वस्तूंवरील कर वाढवून तूट भरून काढण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. दरवेळी बजेटमधून मोठ्या निधीची तरतूद केली जाते. पण प्रत्यक्षातील परिणाम किंवा बदल मात्र फार कमी पहायला मिळतात. सध्याची परिस्थिती काय आहे आणि त्यावर काय उपायांची गरज आहे, त्यावर एक नजर टाकूयात- विविध खात्यांसाठी, योजनांसाठी अनेक कोटी रुपयांची तरतूद होते. पण ढिसाळ अमलबजावणी आणि भ्रष्टाचारामुळे हा पैसा गरजूंपर्यंत पोचतच नाही.यावर सिक्स्थ पे कमिशनने उपाय सुचवलाय तो सरकारी कर्मचार्‍यांना त्यांच्या परफॉर्मन्सनुसार पगार आणि पगारवाढ देण्याचा.सध्या महाराष्ट्रावर कर्ज आहे ते 1.86 लाख कोटी रुपयांचे. पुढचे आर्थिक वर्ष संपेपर्यंत हे कर्ज वाढून 2 लाख कोटींवर पोचण्याचा अंदाज आहे. व्याजाची रक्कमच पोहोचेल 14 हजार 860 कोटींवर.यासाठी फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी ऍण्ड मॅनेजमेंट बिल पास होणे गरजेचे आहे. यामुळे देण्यात आलेल्या पैशांसाठी सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांना जबाबदार धरले जाईल.रेशन व्यवस्था ढिसाळ झाली आहे. ही व्यवस्था योग्य अवस्थेत असती तर महागाईची झळ गरिबांना बसली नसती.यासाठी रेशन व्यवस्था, त्यासाठीची गोडाऊन्स यांची तपासणी होणे गरजेचे आहे. रेशनच्या धान्याच्या होणार्‍या काळा बाजारालाही आळा घालण्याची गरज आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 25, 2010 07:29 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2010 07:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close