S M L

अंबरनाथमध्ये काँग्रेस नगरसेवकाने घरात घुसून एकावर केला प्राणघातक हल्ला

Sachin Salve | Updated On: May 2, 2016 11:44 AM IST

अंबरनाथमध्ये काँग्रेस नगरसेवकाने घरात घुसून एकावर केला प्राणघातक हल्ला

अंबरनाथ - 02 मे : अंबरनाथमध्ये सुरेंद्र नागो यादव या काँग्रेसच्या नगरसेवकाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने नागरिक सुरेंद्र रामसबद यादव यांना जबर मारहाण केली आहे. सुरेंद्र यांच्या घरात घुसून लोखंडी रॉड आणि इतर तीक्ष्ण हत्यारांचा साहाय्याने त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

सुरेंद्र यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी नगरसेवक सुरेंद्र नागो यादव, श्रीराम यादव, विजय यादव, अजय यादव,अनुज सिंग आणि इतर 10 जणांवर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

सुरेंद्र नागो यादव हा नगरसेवक हा गुंड प्रवृत्तीचा असल्याने त्याच्या विरोधात तक्रारदार सुरेंद्र रामसबद यादव हा वारंवार पोलीस ठाण्यात तक्रार करीत असल्याचा राग मनात धरून हा जीवघेणा हल्ला झाला असल्याने बोललं जात आहे. काँग्रेस नगरसेवक सुरेंद्र नागो यादव याच्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्याला यापूर्वी 6 महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते.

दरम्यान, या हल्ल्यात नगरसेवकांचा साथीदार याने आपल्यावर ही हल्ला केल्याचा आरोप करीत तक्रारदाराविरोधात फिर्याद दिली असल्याने दोन्ही गटामधील लोकांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. महत्वाचे म्हणजे काँग्रेस नगरसेवक आणि हल्ल्यात जखमी झालेला तक्रारदार यांची नावे समान आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2016 11:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close