S M L

प्रत्येकाच्या डोक्यावर 18 हजार 292 रुपयाचे कर्ज

आशिष जाधव, मुंबई 25 मार्च महाराष्ट्र राज्य कर्जाच्या विळख्यात सापडले आहे. आज राज्यातील प्रत्येक माणसाच्या डोक्यावर 18 हजार 292 रुपयाचे कर्ज आहे. युती सरकारच्या काळात कर्ज1999 ला सेना-भाजप युती सरकारने जेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या होत्या, तेव्हा राज्याच्या डोक्यावर 42,666 कोटी रुपयांचे कर्ज होते. तर त्या कर्जाचे व्याज झाले होते, 4,884 कोटी रुपये. त्यानंतर आघाडी सरकारने सरासरी 17.2 टक्के दराने दरवर्षी कर्ज काढण्याचा सपाटाच लावला. आज म्हणजे 2009-10 मध्ये कर्जाची रक्कम आहे, 1 लाख 85 हजार 801 कोटी रुपये, तर कर्जावरच्या व्याजाची रक्कम आहे, 14 हजार 860 कोटी रुपये. म्हणजेच कर्ज आणि त्यावरचे व्याज मिळून राज्यावर एकूण 2 लाख 661 हजार कोटी रुपयांचा बोजा आहे. याचा दुसरा अर्थ सध्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर 18 हजार 292 रुपयांचे कर्ज झाले आहे. पण कर्जाची रक्कम यापेक्षा कितीतरी जास्त असल्याचा आणि एकूण रक्कम फार अधिक असल्याचा दावा विरोधक करत आहेत.आघाडीने काढले भरमसाठ कर्जकुठलेही राज्य विकास कामांसाठी कर्ज काढते. तसे महाराष्ट्रानेही काढले. गेल्या दहा वर्षांच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने भरमसाठ कर्ज काढले. पण त्या मानाने विकास कामांच्या माध्यमातून जी भांडवली मालमत्ता अर्थात ऍसेट निर्माण व्हायला पाहिजे, ती झालेली नाही. ही बाब गेल्या दहा वर्षात भांडवली खर्चाचा जो विनियोग झाला, त्यावरून सहज लक्षात येते. आघाडी सरकारने विकास कामांवर 53 टक्के निधीच खर्च केला. म्हणजे विकास कामांच्या व्यतिरिक्त बाबींवर 47 टक्के पैसा खर्च करण्यात आला. राजकोषीय तुटीचे प्रमाण वाढलेवित्तीय तुटीचे राज्याच्या उत्पन्नाशी असलेल्या प्रमाणावरून राज्याच्या आर्थिक स्थितीचं आकलन होते. सध्या राजकोषीय तुटीचे प्रमाण फार जास्त झाले आहे. राजकोषीय तूट ही 26 हजार 562 कोटी रुपयांवर गेली आहे. तर महसुली तूट 7 हजार 123 कोटी रुपयांची झाली आहे. त्यात विकास प्रकल्प रखडल्याने राज्याची मिळकत कमी झाली आहे. त्यामुळे वित्तीय तूट भरून काढण्यासाठी आणखी कर्ज काढावे लागणार आहे. एकूणच राज्य कर्जाच्या विळख्यात पूर्णपणे जेरबंद झाल्याचे वास्तव चित्र आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 25, 2010 07:42 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2010 07:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close