S M L

स्थानिकांच्या विरोधात मेडीगट्टा-कालेश्वर प्रकल्पाचं अखेर भूमिपूजन

Sachin Salve | Updated On: May 2, 2016 01:20 PM IST

स्थानिकांच्या विरोधात मेडीगट्टा-कालेश्वर प्रकल्पाचं अखेर भूमिपूजन

गडचिरोली - 02 मे : गोदावरी नदीवर तेलंगणा सरकार धरणं बांधणार आहे. या प्रकल्पाचं भूमिपूजन मोठ्या विरोधात पार पडलं. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव याच्या उपस्थिती भूमिपूजन झालंय. या भूमिपूजन सोहळ्याला स्थानिक आणि काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध दर्शवत सरकारला काळे झेंडे दाखवले.

मेडीगट्टा इथल्या मेडिगट्टा-कालेश्वर प्रकल्पाचं आज (सोमवारी) सकाळी भूमिपूजन झालं. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी हे भूमिपूजन केलं. के सी राव यांच्यासोबत तेलंगणाचे काही मंत्रीदेखील हजर होते. या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातल्या 22 गावांमधली सुपिक जमीन धरणाखाली जाणार आहे. त्यामुळे तिथल्या शेतकर्‍यांनी या भूमिपूजनाविरोधात आंदोलन केलं. यावेळी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे कार्यकर्तेही हजर होते. त्यांनी या वेळी काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली. तेलंगणा सरकार गोदावरी नदीवर हे धरण बांधतंय. सिरोंचा तालुक्यातल्या 22 गावांची सुपीक जमीन धरणाखाली जाणार आहे. तर 18 हजार शेतकरी विस्थापीत होण्याचीही भीती आहे. त्यामुळे या धरणाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2016 01:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close