S M L

वांद्रे-वरळी सी-लिंक दोन दिवस राहणार बंद

Samruddha Bhambure | Updated On: May 2, 2016 06:35 PM IST

वांद्रे-वरळी सी-लिंक दोन दिवस राहणार बंद

मुंबई – 02 मे :  मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंक सोमवारी आणि मंगळवारी रात्री बंद राहणार आहे. डांबरीकरणाच्या कामासाठी हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.

सोमवारी, दोन मे रोजी रात्री दहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत वांद्रे ते वरळी या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर मंगळवारी, 3 मे रोजी वरळी ते वांद्रे या मार्गावरील वाहतूक रात्री दहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात मुंबई एंट्री पॉईंट्स लिमिटेड या कंपनीकडून मार्गावरील डांबरीकरणाचं काम पूर्ण करण्यात येणार आहे.

2009 मध्ये या सी लिंकवरून वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदाच डागडुजीच्या कारणांसाठी या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या दोन्ही दिवशी रात्रीच्या वेळी वाहनचालकांनी माहीम कॉजवे, दादर, प्रभादेवी या मार्गाचा वापर करण्याचं आवाहन एमएसआरडीसीनं केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2016 06:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close