S M L

बिल्डर्स मुंबईतील भागांची नावं बदलताय, अनिल देसाईंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Sachin Salve | Updated On: May 3, 2016 12:32 PM IST

anil desai03 मे : काही बिल्डर्स मुंबईतील भागांची नावं बदलत असल्याची तक्रार शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीये. त्यांनी पत्र लिहून या बिल्डरांवर कारवाई करण्याची मागणी केलीये.

अनिल देसाई यांनी आपल्या पत्रात अंधेरीला अप्पर जुहू, परळला अप्पर वरळी, कलानगरला बीकेसी ऍनेक्स अशी नावं काही बिल्डर्स देत असल्याचा आरोप केलाय. असं करणं बेकायदेशीर आहे. या प्रकारांनी बिल्डर ग्राहकांना फसवतायत, अशा सगळ्या बिल्डर्सना दंड आकारण्यात यावा, बांधकामे थांबवावीत, अशी मागणी देसाईंनी मुख्यमंत्र्यांकडे केलीये. या निमित्ताने महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं पुन्हा एकदा मराठीच्या मुद्याला हात घातलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2016 12:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close