S M L

अशीही पाणीचोरी, थेट अग्निशमन दलाची गाडीच बोलावली घरी !

Sachin Salve | Updated On: May 3, 2016 01:53 PM IST

अशीही पाणीचोरी, थेट अग्निशमन दलाची गाडीच बोलावली घरी !

03 मे : दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे पाण्याची चोरी होण्याच्या घटना वाढल्यात. भंडारा नगर परिषदेच्या एका कर्मचार्‍यानं चक्क अग्निशमन दलाची गाडी थेट स्वतःच्या घरी नेली आणि त्यातलं पाणी घरच्या टाकीत ओतलं. धर्मेंद्र साखरकर असं या कर्मचार्‍याचं नाव आहे. हा प्रकार आमच्या प्रतिनिधीच्याच लक्षात आला. अग्निशमन दलाची गाडी जाताना पाहून शहरामध्ये कुठे आग लागली असावी असं आमच्या प्रतिनिधीला वाटलं, म्हणून त्यानं या गाडीचा पाठलाग गेला तेव्हा हा प्रकार उघड झाला.

त्याचं झालं असं की, अचानकपणे अग्निशमन दलाची गाडी सुसाट धावत निघाली होती. आणि ही गाडी एका घरासमोर जाऊन थांबली. हे घरं होतं वरिष्ठ लिपिक धर्मेंद्र साखरकर यांचं. या ठिकाणी ही अग्निशमन दलाची गाडी उभी करून तिसर्‍या माळ्यावर पाईप लाईन टाकून पाणी चढवण्यात येत असलायचं लक्षात आलं. हा प्रकार कॅमेर्‍यात कैद होताच वरिष्ठ लिपिकाची चांगलीच फजिती झाली. माफ करा चूक झाली यापुढे गाडी घरी आणणार नाही असा पाढा वाचायला सुरुवात केला आणि लगेच पाणी बंद करायला सागितलं. मात्र कॅमेरा बंद होताच पुन्हा पाणी भरायला सुरुवात केली .तुम्ही अग्निशमन गाडीतून पाणी का?, भरत आहात अशी विचारणा केली असता मला माफ करा चूक झाली एवढंच उत्तर या लिपिकाने दिलं. शहरात इतर लोकांना पाणी मिळत नाही मात्र भंडारानगर परिषदेचे कर्मचारी सर्रासपणे पाणी चोरी करीत आहेत. या विषयी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना विचारले असता या कर्मचार्‍यावर दंडात्मक कार्यवाही करू आणि त्यांना नोटीस बजावू असं मुख्यधिकारी यांनी सागितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2016 01:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close