S M L

‘खेलरत्न’साठी विराट कोहलीच्या नावाची शिफारस

Samruddha Bhambure | Updated On: May 3, 2016 09:53 PM IST

virat43523452345

03 मे :  क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजल्या जाणार्‍या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी बीसीसीआयने यावर्षी टीम इंडियाचा धडाकेबाज प्लेअर विराट कोहलीच्या नावाची शिफारस केली आहे, तर अर्जुन पुरस्कारा'साठी अजिंक्य रहाणेचं नाव सुचवण्यात आलं आहे.

ट्वेन्टी-20 वर्ल्डकपमध्ये केलेल्या दमदार कामगिरीबद्दल विराटला खेलरत्नने गौरवण्यात यावं, असं बीसीसीआयचं म्हणणं आहे. विराटने तीन महत्त्वपूर्ण सामन्यांत अर्धशतकं झळकावून टीमला विजय मिळवून दिला होता. विराटच्या या सातत्यपूर्ण कामगिरीचा सन्मान देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने व्हावा, अशी शिफारस बीसीसीआयने केली आहे. विराट कोहली शिवाय यंदा खेलरत्नसाठी नेमबाज जितू राय, स्वॉशपटू दीपिका पल्लिकल, टिंटू लुका, गोल्फपटू अनिर्बन लाहिरी हे क्रीडापटूही शर्यतीत आहेत.

दरम्यान, आजवर केवळ दोन क्रिकेटपटूंना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला 1997-98 साली आणि आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला 2007 साली खेलरत्नने सन्मानित करण्यात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2016 07:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close