S M L

डोंबिवलीत महिलांना मॅक्सी घालून मंदिरात प्रवेश करण्यास बंदी

Samruddha Bhambure | Updated On: May 5, 2016 06:04 PM IST

डोंबिवलीत महिलांना मॅक्सी घालून मंदिरात प्रवेश करण्यास बंदी

मुंबई – 05 मे :  गेल्या काही दिवसांपासून महिलांचा मंदिर प्रवेश चांगलाच गाजत असून राज्यभर भूमाता ब्रिगेडसह महिला संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच डोंबिवलीमध्ये मॅक्सी घालून मंदिरात प्रवेश करण्यास बंदी असल्याचा फलक मंदिराबाहेर लावण्यात आला आहे. याबाबत संबंधित मंदिर प्रशासनाने आम्ही श्रद्धाळू आहोत, अंधश्रद्धाळू नाही. मात्र मंदिराची पवित्रता राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

महिलांना मंदिर प्रवेशासाठी शनीशिंगणापूरपासून सुरू झालेले आंदोलनाचे लोण त्र्यंबकेश्वर मंदिर आणि आता हाजीअली दर्गापर्यंत येऊन पोहचलं आहे. त्यातच आता डोंबिवली पूर्वेकडील कोपर गावात असणार्‍या गावदेवी मंदिर, महादेव मंदिर आणि हनुमान मंदिरात महिलांना मॅक्सी घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तशी सूचना असलेले फलक मंदिराबाहेर लावण्यात आले आहेत.

राज्यभर सुरू असणार्‍या मंदिर प्रवेश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे फलक चर्चेचा विषय ठरले आहेत. याबाबत गावदेवी मित्र मंडळ आणि तीनही मंदिराची देखभाल करणारे शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आम्ही पुरोगामी विचारसरणीचे आहोत, अंधश्रद्धाळू नाही. पण मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असून नागरिकांनी या निर्णयाचे समर्थन केल्याचे सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2016 05:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close