S M L

नागपुरात वादळासह अवकाळी पावसाची हजेरी

Samruddha Bhambure | Updated On: May 6, 2016 08:40 AM IST

MUMBAI RAIN (5)

नागपूर - 05 मे : राज्याच्या उपराजधानीत आज (गुरुवारी) संध्याकाळी वादळासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शिवाय जिल्ह्यातील काही भागात तुफान गारपीटसुद्धा झाली. यामुळे 45.3 अंशापर्यंत वर चढलेला पारा 40.4 अंशावर खाली आला असून, नागपृरकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

एप्रिल महिन्यात उन्हाने होरपळून काढल्यानंतर मे महिन्यात गेल्या चार दिवसात पावसाने नागपुरात तिसर्‍यांदा हजेरी लावली. दुपारी 4 वाजतापर्यंत सर्वत्र रखरखते ऊन्ह होते. पण त्यानंतर पुढच्या तासाभरात अचानक वातावरण बदललं. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी करून जोराचे वादळ सुटलं, आणि काहीच वेळात धो धो पावसाला सुरुवात झाली. या अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली.

नागपूर, भंडारा, पुणे, वाशिम, बुलडाणा, अमरावतीसह हिंगोलीतही पाऊस पडला. अचानक पडलेल्या पावसाने जनजीवन काही काळ विस्कळीत झाले, परंतू ऐन उन्हाच्या दिवसांमध्ये पाऊस पडल्याने वातावणात थंडावा निर्माण झाला असून शेतकरी मात्र सुखावला आहे. तर धुळ्यात एका महिलेचा विज अंगावर पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2016 10:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close