S M L

पैसे पडले सांगून चोरट्यांनी केले 2.60 लाख लंपास

Sachin Salve | Updated On: May 6, 2016 01:25 PM IST

पैसे पडले सांगून चोरट्यांनी केले 2.60 लाख लंपास

मुंबई -06 मे : 'अंकल आपके पैसे गीर गये हैं' असं सांगून चोरट्यांनी एका व्यापार्‍याकडून तब्बत 2 लाख 60 लुटल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडलीये. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालाय.

उल्हासनगरमध्ये राजेश के वाधवा मिनर्व्हा शूज दुकानाचे मालक यांनी दुपारी 2 वाजता आयसीआयसी बँकेतून 2 लाख 60 हजार रुपये काढले. बँकेतून बाहेर आल्यानंतर काही अनोळखी बाइक चालकांनी त्यांना सांगितलं 'अंकल आपके पैसे गीर गाये है' हे ऐकून राजेश वाधवा यांनी खाली वाकले हीच संधी साधून चोरट्याने त्याची पैशाची बॅग पळवली.

एकीकडे साखळी चोर पकडण्याचे सत्र सुरू असताना चोरांना पोलिसांचा किंवा कायद्याचा कोणताही धाक राहिलेला दिसत नाही. सदर गुन्ह्याचा तपास उल्हासनगर हिल लाइन पोलीस स्थानक करीत असून लवकरात लवकर चोरट्या ना पकडण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 6, 2016 01:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close