S M L

'बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिल अजूनही राज्य सरकारच्या ताब्यात नाही'

Sachin Salve | Updated On: May 6, 2016 02:20 PM IST

INDU MILL BHUMI POOJAN06 मे : डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या इंदू मिल जमिनी संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारकडून जनतेची फसवणूक झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेत डॉ.राजू वाघमारे यांनी केलाय. इंदू मिलची जागा अद्यापही केंद्र सरकारने राज्यसरकारकडे हस्तांतरीत केलेली नाही, असा आरोप वाघमारे यांनी केलाय.

स्मारकाच्या मुद्यावरून घोर फसवणूक झाल्याने भाजपने जनतेची माफी मागावी अशी मागणीही वाघमारे यांनी केलीय. दरम्यान, स्मारकाची जागा पुढच्या आठवड्यापर्यंत नक्की हस्तांतरीत होईल असा दावा रामदास आठवलेंनी केलाय. केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी आपल्याला यासंबंधीचं आश्वासन दिल्याचं आठवलेंनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 6, 2016 02:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close