S M L

'केबीसी' घोटाळ्यातील मुख्य सूत्रधाराला मुंबईत अटक

Samruddha Bhambure | Updated On: May 6, 2016 04:01 PM IST

'केबीसी' घोटाळ्यातील मुख्य सूत्रधाराला मुंबईत अटक

मुंबई  - 06 मे : केबीसी घोटाळाचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाणला आज (शुक्रवारी) पोलिसांनी अटक केली आहे. दीड वर्षांपूर्वी 'केबीसी' कंपनीनं 'रक्कम गुंतवा आणि तिप्पट मिळवा' असा आमिष दाखवून हजारो लोकांची फसवणूक केली होती. अखेर आज असंख्य गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा चुना लावणार्‍या संचालकाला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

केबीसी कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधींचा चुना लावणार्‍या संचालक भाऊसाहेब चव्हाण यांच्या विरोधात सुमारे 2700 गुंतवणूकदारांनी आडगाव पोलिसाकंडे तक्रारी केल्या आहेत. या प्रकरणात जवळपास एकट्या नाशिकमध्ये 210 कोटीं रुपयांची फसवणूक झल्याचं समोर आलं होतं. या घटनेनंतर पोलिसांनी काही एजंट्सना ताब्यातही घेतलं होतं. मात्र, या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आपल्या पत्नीसह देश सोडून पळून गेला होता. आज तो मुंबई विमानतळ दाखल होताच, मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यात आलं.

दरम्यान, राज्यातील विविध भागात जवळ पास 350 कोटींची नागरिकांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी फेब्रुवारी 2014 मध्ये चव्हाण विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 6, 2016 04:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close